Saturday, March 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्पोकन इंग्लिश मुक ऑनलाइन उपक्रम शिक्षणातील नवसंधी- डॉ. विद्या बोरसे यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्पोकन इंग्लिश मुक ऑनलाइन उपक्रम शिक्षणातील नवसंधी- डॉ. विद्या बोरसे यांचे प्रतिपादन

एरंडोल(प्रतिनिधी)- शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आज एरंडोल येथे तालुकास्तरीय स्पोकन इंग्लिश मुक ऑनलाईन उपक्रमाचा शुभारंभ येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटसाधन केंद्राच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व व्यावसायिक विकास प्रशिक्षण संस्थेचे इंग्रजी विभाग प्रमुख तसेच या उपक्रमाच्या जिल्हाप्रमुख ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.विद्या बोरसे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शासनाच्या निर्देशानुसार केक कापून या महत्वाकांशी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर  तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नरेंद्र फकीरा चौधरी,तालुक्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक   विश्वासराव पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र लाळगे, नारायण बोरसे, सुनील महाजन, अल्लाउद्दीन शेख, तेजस  ऑनलाईन उपक्रमाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक जयश्री  पाटील, तेजस प्रकल्पाचे कॉर्डिनेटर किशोर पाटील कुंझरकर, अरविंद कडू आदींची उपस्थिती होती.यावेळी तालुक्यातील मराठी,उर्दू आणि कासोदा या तीन केंद्रातील तेजस प्रकल्पात समावेश असलेले सर्व टॅग शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता वाचता यावे तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी या करिता महाराष्ट्र राज्य शासन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०१६मध्ये प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद द्वारे स्पोकन इंग्लिश प्रोग्राम ची सुरुवात करण्यात आली होती.त्यानंतर २०१७/१८ या शैक्षणिक वर्षापर्यंत सुमारे ३५हजार शिक्षकांना स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण फेस टू फेस देण्यात आले. स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणासाठी ९०हजारपेक्षा अधिक शिक्षकांची मागणी लक्षात घेता एवढ्या मोठ्या संख्येने मागणी असणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण फेस टू फेस समोरासमोर स्वरूपात देणे आव्हानात्मक व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते .इंग्रजी भाषा ही ग्लोबल लॅंग्वेज म्हणून २१व्या शतकातील कौशल्य म्हणून शाळास्तरावर मुलांमध्ये रूजणे आवश्यक आहे. याकरिता त्याशिवाय आपल्या शाळेतील मुले येणार्‍या आव्हानांना समर्थपणे सामना करू शकणार नाहीत या अनुषंगाने इंग्रजी भाषेच्या प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता ब्लेंडेड किंवा ऑनलाइन स्वरूपाचा वेळेनुसार तांत्रिक कौशल्याचा वापर करून व उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन ज्ञान व अध्यापनाची नवीन कौशल्य सहज शिकणे सुलभ होईल आणि त्याचा वापर वर्गातील शंभर टक्के मुले शिकण्यासाठी करतील अशी व्यवस्था तयार करून शिक्षकांना उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. विद्यार्थ्यांना इंग्रजी मध्ये बोलता आणि वाचता यावे यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव यांचे मार्गदर्शनाखाली रा औरंगाबाद ने स्पोकन इंग्लिश मुक MOOC ऑनलाईन कोर्स चा पथदर्शी अभ्यास क्रम तयार केला असून आज एरंडोल तालुक्यात त्याचा शुभारंभ होत असल्याचा आनंद होत आहे, असे यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बोरसे म्हणाल्याआमच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या सुप्त गुण ओळखून वेळोवळी संधी उपलब्ध करून दिले व मार्गदर्शन केल्याचे यावेळी प्रास्ताविकात मूक कॉर्डिनेटर जयश्री पाटील यांनी म्हटले.तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले , ऑनलाईन कोर्स  तालुक्यात आज शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत शिक्षकांनी वापरावयाची विविध तांत्रिक कौशल्य व सराव यासंदर्भात पंधरा घटक उपलब्ध करून दिले. शिक्षकांनी शिकलेल्या भागाचा वर्गात वापर करून तीन व्हिडिओचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद स्पोकन इंग्लिश MOOC मुक वेबसाईट वर अपलोड करायचे आहेत . आपल्या तालुक्यात इंग्रजी पद्युत्तर पदवी असलेल्या त्यानंतर स्वतःच्या मुलांनाही जि प शाळेत दाखल करून सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करणाऱ्या जयश्री पुरुषोत्तम पाटील यांच इंग्रजीवर प्रभुत्व असून त्यांनी या विषयासाठी घेतलेला पुढाकार गौरवास्पद असल्याचे म्हटले.शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी इंग्रजीची कास धरण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना  कॉर्डिनेटर जयश्री पाटील म्हणाल्या ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात येणार आहे .हा संपूर्ण ऑनलाईन कोर्स सहा ते आठ आठवड्यात पूर्ण करावयाचा आहे. तालुक्यातील कासोदा ,एरंडोल उर्दू , मराठीच्या शिक्षकांसाठी आज शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून या महत्त्वपूर्ण महत्वाकांशी उपक्रमाचा सर्वांना लाभ होणार आहे व इंग्रजी विषयात सर्वांचा आत्मविश्वास वाढून सर्वांना इंग्रजी वाचते बोलते व्हायला मदत होणार आहे.सदरील पथदर्शी उपक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.वंदना कृष्णा,  राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त डॉ.विशाल सोळंकी आदींच्या सखोल मार्गदर्शनाची साथ आहे.प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद चे संचालक डॉ. सुभाष कांबळे, डॉ.उज्वल करवंदे, डॉ.रणजीत देशमुख,डॉ. प्रमोद कुमावत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन. पाटील,जळगाव डी.आय.सी.पी.डी प्रा.डॉ. मंजुषा क्षीरसागर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.विद्या बोरसे, संदीप उदावंत, अमृता भालेराव, शिक्षणाधिकारी डॉ.डी.एम. देवांग,  गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विश्वास पाटील, सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती आदींचे यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.   तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, जि. प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जि.प. शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, एरंडोल पं.स.सभापती रंजना सोनवणे, मोहन भाऊ सोनवणे, पं.स.उपसभापती अनिल भाऊ महाजन, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी या पथदर्शी उपक्रमाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे यावेळी जयश्री पाटील यांनी म्हटले.  सूत्रसंचालन किशोर पाटील कुंझरकर यांनी तर आभार जयश्री पाटील यांनी मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बाप्पा माझा… सेल्फी विथ बाप्पा….

Next Post

“मोटरमन” ला निरोप देतांना, मुंबईकरांचे डोळे पाणावले

Next Post

"मोटरमन" ला निरोप देतांना, मुंबईकरांचे डोळे पाणावले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d