Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यासाठी अधिकाधिक अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नाबार्डच्या अध्यक्षांसमेवत चर्चा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यासाठी अधिकाधिक अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नाबार्डच्या अध्यक्षांसमेवत चर्चा

मुंबई(प्रतिनिधी)- राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील प्रकल्प, योजनांना अर्थसहाय्याची गरज असते. त्यासाठी नाबार्डकडून अधिकाअधिक अर्थसहाय्य मिळवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील विविध विभागांनी त्यांच्याशी निगडीत क्षेत्रांबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कूमार, कृषी विभागाचे उपसचिव सुशिल खोडवेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,’ राज्यातील महत्वपूर्ण योजना, प्रकल्प यांना वित्तीय सहाय्याची आवश्यकता भासते. त्यासाठी नाबार्ड आणि विविध विभागांचा समन्वयही आवश्यक आहे. राज्यातील पायाभूत सुविधा तसेच विविध योजना, प्रकल्पांना नाबार्डकडून वित्तीय सहकार्य मिळावे यासाठी त्या-त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन, प्राधान्यक्रम आणि निश्चित असा आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यात यावा.

यावेळी झालेल्या चर्चेत नाबार्डकडून प्राधान्याने वित्तीय सहाय्यता देण्यात येणाऱ्या क्षेत्रांसह, जलसंपदा, रस्ते बांधणी, कृषी, सहकार, महिला सबलीकरण, स्वयंसहायता बचत गट, कृषी निर्यात यांच्यासह पर्यावरणीय बदलांना तोंड देण्यासाठीचे विविध प्रकल्प यांच्या अनुषंगानेही चर्चा झाली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अर्जेंटिना रिपब्लिकच्या शिष्टमंडळाने घेतली पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांची भेट

Next Post

…आता प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन होणार; गृहमंत्र्यांचे निर्देश

Next Post
…आता प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन होणार; गृहमंत्र्यांचे निर्देश

...आता प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन होणार; गृहमंत्र्यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d