Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

पुणे(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासाचे अनेक विभाग जिल्हा परिषदेशी जोडले गेले आहेत. शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासातील अडचणी गतीने सोडविण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी यासाठी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी योजना सुरू करून राज्याने देशासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, 28 हजार कोटी रूपयांचा 15 वा वित्त आयोग आहे. यामध्ये 80 टक्के ग्रामपंचायत, 10 टक्के जिल्हा परिषद व 10 टक्के पंचायत समिती असा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे निर्णय घेतले जात असताना लोककल्याणाची भूमिका ठेवून ग्रमाविकास विभागाने काम करावे,असेही ते म्हणाले.प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य शासनाने चांगली कामगिरी केली आहे.

महाआवास योजनेच्या माध्यमातून सहा लाख घरे ग्रामविकास विभागाने बांधली आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य, गरिब कुटुंबाचे घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. राहीलेली 2 लाख 62 हजार घरेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून चांगले कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात बचतगटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही श्री. मुश्रीफ यांनी दिले.अपर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून पथदर्शी काम राज्यात झाले आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आजची कार्यशाळा निश्चितपणे नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Team Satymev Jayate

Previous Post

देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार; “शावैम” च्या डॉक्टरांचे राजकोटला चार संशोधन सादर

Next Post

आई तू नेहमीच सत्यासाठी जन्म घेतेस, आणि तू मरतेही सत्य समजावे म्हणून -सुरज जाधव

Next Post
आई तू नेहमीच सत्यासाठी जन्म घेतेस,   आणि तू मरतेही सत्य समजावे म्हणून -सुरज जाधव

आई तू नेहमीच सत्यासाठी जन्म घेतेस, आणि तू मरतेही सत्य समजावे म्हणून -सुरज जाधव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo