<
आई तू नेहमीच सत्यासाठी जन्म घेतेस. आणि तू मरतेही सत्य समजावे म्हणून.आईची ममता जाणवतेस.प्रियसीचा प्रेम देतेस.मैत्रिणी सारखी गरबा ही खेळतेस… बहिणी सारखी काळजी घेतेस.तू सखी वाटतेस आईनसू दे ना आई यंदा गरबा,आम्हीं सोशल डिस्टन्स पाळून कोरोनाची सर्व जबाबदारी घेऊ.फार काही देऊ की नाही देऊ तुला पण सर्व घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज करण्याचे वचन देऊ.आई तूच तर दिसत होती मला,अशीच इंजेक्शन घेऊन कोरोनाच्या छातडावर उभीरंगीत साड्याच माहित नाही पण हा मास्क चा संदेश देणारी.आई … आई .. …एक सांगू का ग तुला ? ?आई बस ना ग आताया महामारीला टाळ ग ..!सीमेवर जवान लढतो आहे अन् आत किसान ढसा ढसा रडतो आहे..मला काहीच नको आई …बस त्याच्या चेहऱ्यावर हसू आन ना ग ..!