<
अमळनेर(प्रतिनिधी)- येथील केले नगर मधील ओपन प्लेस लगतचे सर्वच रस्ते हे गेल्या सहा महिन्यापासून अंधारमय होते. वेळोवेळी नगरपालिकेत विनंती करून देखील त्याच्यावर कुठलीही दखल घेण्यात आली नाही.
रात्री पायी ये जा करणाऱ्या नागरिकांना भीती निर्माण होत असे केले नगर गणपती मंडळातील सर्व सदस्य यांनी निलेश फाफोरेकर यांच्याकडे परिसरात लाईटची व्यवस्था व्हावी अशी विनंती केली. त्या विनंतीला लगेच दुजोरा देऊन श्री.फाफोरेकर यांनी स्वखर्चाने पैसे खर्च करून दोन एलईडी लाईट आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर लावून दिलेत आणि अंधारमय रस्ते प्रकाशमय केले.
तसेच काही दिवसांपूर्वीही श्री.फाफोरेकर यांनी केले नगर येथील ओपन प्लेस मधील काटेरी झुडपांनी वेढलेले पटांगण जेसीबीच्या साह्याने काढून त्याठिकाणी दहा जीवन उपयोगी झाडांची लागवड करून काटेरी झुडपांनी वेढलेल्या पटांगणाला आता क्रिडांगणाचे रूप मिळवून दिले. निलेश फाफोरेकर यांनी स्वखर्चाने हे सर्व कामे केलीत त्याबद्दल उपस्थित विनोद सूर्यवंश, श्री.सोये, श्री. सूर्यवंशी, अण्णा पाटील, प्रकाश पाटील, श्री.ठाकरे, बी. बी.पाटील, श्री मुके, चेतन सोनटक्के, दीपक पाटील, श्याम पाटील, हेमंत शिंदे व उपस्थित सर्व महिला वर्ग यांनी निलेश फाफोरेकर यांचे शब्द रूपी आभार व्यक्त केले व पुढे ही अशीच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.