<
जळगांव(चेतन निंबोळकर)- चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील अवंता फाऊंडेशन सचिव प्रियांका ढिवरे यांनी आजतगायत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहे. अवंता फाऊंडेशन राज्यातील जळगाव, धुळे, पालघर, नंदुरबार जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य निरंतर करत आहे.
फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी पंचायत समिती चोपडा यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणा शालेय किशोरवयीन मुला-मुलींसाठी लैंगिक शिक्षण समुपदेशन, प्रशिक्षण प्रकल्प- या माध्यमातून समुपदेशना बरोबरच शालेय मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. लैंगिक शिक्षण बाबत जनजागृती व समस्यांचे निवारण केले. तसेच प्रेरणा कौशल्य विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोफत कौशल्य शिक्षण व रोजगार उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले.
फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीब शालेय विद्यार्थ्यां दत्तक योजना या प्रकल्पा अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन वार्षिक मदत ही केली जाते. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशात धुमाकूळ घातलेल्या कोविड19 या गंभीर आजाराच्या परिस्थितीत फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगांव, धुळे, पालघर जिल्ह्यातील क्षयरोगाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मोफत रेशन किट तसेच प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रम घेऊन गरजूंना आर्थिक मदत देखील केली.
सर्व उपक्रम फाउंडेशन अध्यक्ष मनोहर ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असून या उपक्रमांत जळगाव जिल्हा लैंगिक शिक्षण समुपदेशक स्वप्नाली करंदीकर, माधुरी ढिवरे, पालघर जिल्हा समन्वयक नयन शिंदे हे परिश्रम घेत असतात. असे अवंता फाऊंडेशन सचिव प्रियंका ढिवरे यांनी बोलतांना सांगितले.