<
जळगांव(प्रतिनिधी)- आज सर्वत्र विचार केला तर अनेकानेक कारणास्तव एकल, अविवाहित जीवन जगण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने असे जीवन जगणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतः चे चरितार्थ चालविण्यासाठी नोकरी नाही.
त्यामुळे जगणे मुश्किल असते. हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन समाजात खऱ्या अर्थाने समजून न घेता, सहकार्याच्या भावनेचा अभाव इत्यादी अनेकानेक कारणास्तव त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. तर मग अश्या व्यक्तीने जीवन जगण्यासाठी दाद कोणाकडे मागायची? हा मोठा प्रश्न आहे. अश्या प्रकारे जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या उदरनिर्वाह व विकासासाठी शासनाने विविध योजना राबवाव्या.
तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे शासनाने कोणतेही निकष न लावता मानधन सुरु करावे. जेणेकरून त्यांना समाजात स्वाभिमानाने जगता येईल. तरी शासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन अश्या घटकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी बळ द्यावे. याबाबत स्वारस्य असणाऱ्यांनी आपले मनोगत किंवा सूचना ९३२६३५९२२९ या क्रमांकावर कळवाव्या, असे आवाहन एकल अविवाहित विकास मंचाचे प्रमोद पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.