<
अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील सबगव्हान गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांवर अचानक त्वचेवर गाठी येत असल्याने पशुपालक बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.
लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुधनापासुन इतर जनावरांना संसर्ग होऊं नये यासाठी तातडीने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी सरपंच भारती शशिकांत पाटील यांनी व ग्राम पंचायत कमेटी सबगव्हान यांनी पशुवैद्यकिय अधिकारी श्री. वावडे यांच्याकडे केली होती.
आज रोजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने पशुवैद्यकिय अधिकारी अमळनेर यांची पुर्ण टिम गावात येऊन गुरांना होणारा आजारावर उपचार व लसीकरण करण्यात आले. यात धास्तावलेले पशुपालकांना दिलासा मिळाला. प्रसंगी तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. पी.एस. बर्गे, डॉक्टरांची टिम व ग्रामस्थ यांच्या उपस्थित लसीकरण मोहीम राबवण्यात आली.