<
जळगांव(प्रतिनिधी)- नवरात्री चालू आहे. सर्वजण आदिशक्तीची पूजा अर्चना करून कोरोनाचे आलेले संकट कसे दुर होईल याचे प्रत्येकजण आपापल्या परीने देवीला नवस, गाऱ्हाने करीत आहेत. आपण स्त्रीला देवी मानतो. या नवरात्री मध्ये मुलींची पूजा केली जाते. या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी संस्थेने एका शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलीला या नवरात्री निमित्त पूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य देऊन तीला पुढील शिक्षणासाठी शुभेच्या दिल्या.
सविस्तर माहिती अशी की, नालासोपारा मध्ये राहणारी कु. मानसी गणपत बेकरे या मुलीला दहावीला 51% मिळालेत. घरी आई बाबा व हि एकुलती एक मुलगी. कोरोनामुळे बाबांची नोकरी गेली ते ड्राइव्हरचे काम करत होते. आई छोटी मोठी काम करून घर चालवते. मानसीला पुढील शिक्षण घ्यायचे आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही.
ती नोकरी साठी प्रयत्न करीत होती. पण कमी वयात तिला नोकरी कुठून मिळणार. ही बाब सामाजिक बांधिलकी संस्थेच्च्या लक्षात आली तेव्हा त्या मुलीला कॉलेज मध्ये अँडमिशन व पूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविले. आज नालासोपारा मध्ये या मुलीला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कामेरकर, किरण आरोळकर, स्मिता जठार, ओमी देखले, मिथुन कोरगावकर, सत्यवान जठार उपस्थीत होते. संस्था तिला पूर्ण शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करेल असा मानस यावेळी संस्थेने बोलून दाखविला.