<
जळगांव(चेतन निंबोळकर)- सन २०११ ते आजतगायत जिल्ह्यातील ६०० निराधार बालकांसाठी कार्यरत असून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास करत आहे. गरजू कुटुंबातील मुलांसाठी दरमहा किराणा वाटप, दिवाळीनिमित्त नवीन कपडे, सर्व ६०० मुलांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
तसेच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य विषयक कार्यक्रम घेऊन त्यांना स्वच्छता व आरोग्याविषयी महत्व पटवून देणे. जे दुर्लक्षित मुले शिक्षणापासून वंचित आहे अश्या मुलांच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन त्यांचे मनोबल वाढवणे आदी कार्य निराधार व गरजू मुलांसाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थानी गौरविले आहे. यात माईसाहेब पारखे मेमोरियल ट्रस्ट पुणे यांच्याकडून आदर्श माता पुरस्कार, जळगांव महिला शहर समितीकडून आर्यन लेडी पुरस्कार, स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेकडून रणरागिणी पुरस्कार, बीएम व नजर फाउंडेशन कडून स्त्री शक्तिपीठ पुरस्कार, निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानाकडून खान्देश कन्या पुरस्कार, मौलाना आझाद फाउंडेशन कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श सेवा पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्ट तर्फे रोटरी गौरव पुरस्कार, कल्पविश्व प्रतिष्ठान व सुधाई फाउंडेशन तर्फे समाज भूषण पुरस्कार, शुभकाशी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना वारिअर्स पुरस्कार असे आजतगायत मनिषा बागुल यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.