<
मुंबई(प्रतिनिधी)- टच (टर्निंग अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही संस्था वंचित व निराधार मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.
वंचित आणि सुस्थितीतील मुलांना एकाच छत्राखाली आणण्यासाठी ‘क्रिएटीव टच ‘ या चित्रकला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर १२ व्या ‘क्रिएटीव टच ‘ स्पर्धेसाठी मुलांनी आपल्या घरीच चित्रे काढून संस्थेकडे पाठवायची आहेत.
सदर स्पर्धा ही ४ थी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ३ गटात असून प्रथम पारितोषिक १०,०००/- द्वितीय पारितोषिक ५०००/- तृतीय पारितोषिक २५००/- व उत्तेजनार्थ रू १०००/- रोख स्वरूपात असेल. मुलांनी आपली चित्रे दि. ७ नोव्हेबरपर्यंत संस्थेच्या खालील पत्त्यावर पाठवावीत.पत्ता: आनंदराव पवार स्कूल (तळ मजला), राम मंदिर रोड, वझिरा नाका, बोरिवली (प), मुंबई-४०००९१.स्पर्धेचे विषय हे www.touchmission.com या संकेस्थळावर उपलब्ध असून सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे संस्थेचे स्वयंसेवक श्री. समीर मळेकर यांनी केले आवाहन आहे. अधिक माहितीसाठी ९८१९४५३८७३ क्रमांकावर संपर्क साधावा.