<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील वैशाली कुराडे या सुधाई फाउंडेशनच्या अध्यक्षा असून ते फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
त्यामध्ये मनोबल केंद्रातील विकलांग विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारे साहित्य पुरवणे, जिल्ह्यातील एड्सग्रस्त मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, सातपुडा भागातील आदिवासी बांधवांसाठी गरजेच्या वस्तू पुरवणे, रिमांड होम जळगाव येथील मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, होतकरू मुलांचा शोध घेऊन त्यांना मनोबल केंद्राशी जोडणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस साठी मदत करणे. अश्या पद्धतीने गरीब व गरजू मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक चळवळीत आणण्याचे काम ते फाउंडेशनच्या वतीने करत असतात. तसेच शहरातील फूड व्हॅन या उपक्रमात देखील त्यांचा सहभाग असून त्यांना नेहमी मदत करत असतात.