<
जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक मानसिक स्वास्थ दिनाचा मुहूर्त साधून कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव मीडटाऊन यांनी संयुक्तपणे मोबाईल व्यसन मुक्ती हेल्पलाईन क्रमांकांचा लोकार्पण सोहळा पार पडला.10 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मानसिक स्वास्थ दिन म्हणून साजरा केला जातो.
सध्याच्या किंवा कोवीड नंतरच्या काळात लोकांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. आपण आपले शारीरिक स्वास्थ्य कडे लक्ष देतो पण मानसिक आरोग्याची जास्त काळजी करत नाही किंवा त्याच्या सोबत जुळलेल्या प्रेज्युडीचे मुळे आपण ते लोकां सोबत शेअर करत नाही. सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेक वापरामुळे आपल्या रोजचे दैनंदिनी दिनचर्या किंवा आपल्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरी पारिवारिक वातावरणत खूप कमतरता निर्माण झाली आहे.
त्याचेमुळे सामाजिक व पारिवारिक बांधिलकी, एकामेकांशी बोलण्याचे अभावामुळे आपसातला संपर्क कमी होत चालला आहे. मोबाईल हे मानसिक आजाराचा स्रोत ठरत आहे. ह्या गोष्टीचा आढावा घेतला इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे लेखक तारिक शेख यांनी आणि या संकल्पनेतून मोबाईल व्यसनमुक्ती दूरध्वनी क्रमांक सादर केला. या उपक्रमासाठी त्यांना कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड टाऊन यांनी प्रोत्साहन दिले. एका ऑनलाईन कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मिटच्या माध्यमातून “मोबाईल व्यसनमुक्ती मदत क्रमांक” चा अँग्लो उर्दू जुनियर कॉलेजच्या माजी शिक्षिका अमिना अब्दुल रौफ शेख यांच्या हस्ते पहिला कॉल करून लोकार्पण करण्यात आले.
सदरचे कार्यक्रमात रोटरी क्लब जळगाव मीड टाऊन चे अध्यक्ष डॉक्टर विवेक वडजीकर, राष्ट्रीय मोटीवेशनल ट्रेनर प्रोफेसर सैयद अल्ताफ अली, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, जळगाव सायकॉलॉजिकल कौन्सिलर असोसिएशनचे संस्थापक सदस्य डॉ. अपर्णा मकासरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम अमिना शेख यांनी मोबाईलचे अतिवापरामुळे परिवारात एकमेकांसाठी वेळेचा अभाव व त्यामुळे निर्माण होणारी उणीव भरण्यात या मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांकांचा सहकार्य होईल, असं मत मांडले व कॅटलिस्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब जळगाव मीडटाऊन यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.विवेक वडजिकर यांनी मोबाईल आणि त्याचे जास्त वापरामुळे परिवारात कलह निर्माण होऊन त्याच्याने होणारे वाईट परिणाम याचा आढावा घेतला. त्यानंतर प्रो. सय्यद अल्ताफ अली यांनी मोबाईल व त्याच्या लहान बाळाचे जीवनावर परिणाम व दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ.अपर्णा मकासरे यांना मोबाईलचा जास्त वापर व त्याच्याने शरीरात हॉर्मोन्स मध्ये होणारा बदल आणि त्यामुळे आपले मानसिक स्थितीवर होणारा परिणाम यांच्यावर सविस्तर चर्चा केली. आपण मोबाईलचा किंवा त्याचे जास्त वापराच्या व्यसनाचे बळी पडण्यापेक्षा मोबाईलच्या स्मार्ट वापर करण्यावर जास्त भर दिला पाहिजे.
शेवटी महानगरपालिकेचे आरोग्यधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सध्याचे कोविड काळात मोबाईलचे अतिवापरामुळे बालकांमध्ये खुले वातावरणात खेळण्याच्या सवयीला खुप कमतरता आली आहे. त्याच्या मुख्य कारण माता-पिता यांचा मोबाईल च्या जास्त वापर आहे व मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वात अगोदर माता-पिता यांना आपल्या मोबाईल वापरायचा वेळ सीमित करावा लागेल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी या “मोबाईल डी एडिक्शन हेल्पलाइन” या संकल्पनेचे शिल्पकार तारीक शेख यांनी आपण मोबाईलचा वापर केला पाहिजे, मोबाईल ने आपला वापर करु नये असे सांगून, मान्यवरांचे व सगळे उपस्थित नागरिकांचे आभार मानले व या सुविधेचा जास्त जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
हे नाविन्यपूर्ण प्रकल्प जळगाव नव्हे तर खानदेशातला पहिला प्रकल्प आहे व निशुल्क आहे. सदरहू कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त नागरिक गुगल मीटचे माध्यमातून हजर होते. दूरध्वनी क्रमांक :७५०७६४९४८१ ई-मेल आयडी : [email protected]ही सुविधा मोबाईल वर आहे व ह्या मोबाईल नंबर केव्हा ई-मेलवर संपर्क करणारे व्यक्तींची माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असे आश्वासन रोटरी क्लब ऑफ जळगाव मीडटाऊन चे मानद सचिव तारिक शेख यांनी दिला आहे.