<
जळगांव(प्रतिनिधी)- राजंनंदिनी बहुउद्धेशीय संस्था जळगाव व श्री राजपूत करणी सेना यांच्या तर्फे मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यांचे वितरण करून सत्कामुर्तीना सन्मानीत करण्यात आले.या प्रसंगी प्रगती विद्यामंदिर, जळगाव या शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज भालेराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांनी प्रगती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत.वृक्षारोपण,राखी बनवणे,साबण बनवणे,विज्ञान कृतीतून,प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत त्याच बरोबर हस्तलिखित तयार करेन वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन करून उपक्रम राबविले आहेत.
तसेच ते समाजाप्रती आपले काही देणे लागते या उपकारप्रति निष्ठा ठेवत सामाजिक कार्य सुद्धा करत असतात.त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून हस्तलिखित प्रकाशित आहेत या संपूर्ण उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व श्री राजपूत करणी सेना यांनी मनोज भालेराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले.त्यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थानी सन्मानीत केले आले आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर विधावर्धिनी शिक्षण संस्था,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ संघटना तसेच शिक्षक मित्रपरिवार यांच्याकडून तसेच पालकवर्गाकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व शुभेच्छा दिल्या जात आहेत.