<
शिरसोली-( प्रतिनिधी) – येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव, एस एस मन्यार लाँ कॉलेज व डॅा उल्हास पाटील लॉ कॉलेज जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल्याय व गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गावात शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर विविध घोषणा देत व हातात बॅनरघेवून जनप्रबोधन केले तसेच बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव मार्फत ज्या विविध सेवा व सुविधा पुरवण्यात येतात याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा श्रीमती झोपे मॅडम यांनी स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी असणारे कायदे , बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत अंतर्गत शासनाने 21 जानेवारी 2015 वर्षी सुरू झालेली सुकन्या योजना व विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ह.भ.प.माई साहेब तरुण महिला कीर्तनकार यांनी मुली व महिला ,निराधार, परितकक्त महिला यांच्यासाठी शासनाने राबवलेल्या योजना या बाबत मार्गदर्शन केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समांतर विधि सहाय्यक आरिफ पटेल यांनी विधी प्राधिकरण मार्फत जे विविध उपक्रम राबवले जातात याची सखोल माहिती देवून पुढील योजनांचा विद्यार्थ्यांनी महिलांनी व गरजूनी लाभ घ्यावा यामध्ये विधी सेवा पुढील सेवा देते लोकन्यायालयाचे आयोजन करणे, कारागृहातील पुरुष व महिला कैद्यांना मोफत कायदेशीर मदत, बालगुन्हेगार मध्यस्थ केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना राबवणे,महिलांचे विविध कायदेशीर अधिकार कामाच्या ठिकाणी होणाऱ्या आर्थिक शोषण गर्भलिंगनिदान असंघटित क्षेत्रातील कामगारांचा हक्क व्यापाराला बळी पडलेल्या महिला व मुले यांना कायदेशीर मदत करणे, मनोरुग्ण व मानसिक विकलांग व्यक्तींना औषधोपचार गरिबी निर्मूलन प्रभावी अंमलबजावणी यासाठी मदत ,व्यसनाधीन व मादक पदार्थास बळी पडलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत, ज्येष्ठ नागरिक निराश्रित लोकांना शासकीय योजनांचा मिळवून देणे,बालमजुरी प्रतिबंधक व बालकामगार कायद्याबाबत जनजागृती करणे, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती, रॅगिंग विरोधी कायदा ,सायबर गुन्हेगारी ,शिक्षणाचे अधिकार या बाबत जनजागृतीसह विविध योजनांच्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्याय प्राधिकरणाचे सचिव श्री ए ए के शेख हे होते .त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लिंगभेद, बेटी बचाव बेटी पढाव, विधवा ,परित्यक्ता महिलांसाठी असणारे कायदे, बालमजूरी ,लिंगभेद, महिलांवर होणारे अत्याचार, सामाजिक भेदभाव करणे कायद्याने मान्य नाही तसे केले तर विविध कलमाने अशी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. समाजातील ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिला व पुरुषांना विधी न्याय प्राधीकरण मोफत कायदेशीर सल्ला देत असते याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक पी पी कोल्हे, शिरसोली ग्रामपंचायत चे उपसरपंच मिठाराम पाटील मा सरपंच रामकृष्ण काटोले मा उपसरपंच श्रावण ताडे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत अस्वार गौतम खैरे पो पा श्रीकृष्ण वराडे शाळेचे पर्यवेक्षक एस एस बारी संचालक निलेश बारी(खलसे) प्रवीण पाटील शाळीग्राम पवार भारती कुमावत विधी सेवा पॅनल एडवोकेट विजय दर्जी ,समांतर विधि सहाय्यक अरिफ पटेल ,जावेद पटेल व लॉ कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले यामध्ये आर एस आंबटकर आर के पाटील सी एस कुमावत डी जे कुलकर्णी वैष्णव मॅडम डी के पाटील, आकांशा निकम मॅडम, मनीषा पाउघन, मनीषा बारी, बी आर बारी, ए टी बावसकर, एस एन ताडे, ए एल कोळी, एन ए अकोले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी सावंत ,संजना बारी व अंजली काटोले यांनी केले.