<
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या समाज हा खूप वेगाने बदलत चाललाय, अनेकजण आपल्या शारीरिक व्यंग पलीकडे जाऊन स्वत:चं अस्तित्व निर्माण करत आहेत. यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काही तृतीयपंथीयांनी समाजात आपलं स्थान, आपली ओळख निर्माण केलीय आणि आपल्या इतर साथीदारांच्या उन्नतीसाठीही ते प्रयत्न करत आहेत. काळाबरोबर त्यांचीही मानसिकता बदलत असून आपल्यालाही आत्मसन्मानाने जगता येतं हे त्यांच्या लक्षात आलंय. अशातच सध्या नवरात्रोत्सव असल्याने शहरातील गोलाणी मार्केट मधील स्व. जगन मामा यांच्या घरी दुर्गा मातेची मनोभावे स्थापना केली. त्याठिकाणी दररोज रात्री पुजा जान, अर्चना जान, रेश्मा जान, खुशी जान, कल्याणी जान आदी तृतीयपंथी परिवाराच्या वतीने देवीचे भजन करुन आराधना केली जाते.