<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महिला बचत गट व मायक्रोफायनान्स चे कर्ज केंद्र सरकाने माफ करावे यासंदर्भात दि पीपल्स फाउंडेशनच्या वतीने आज जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, आपल्या परिवाराला हातभार लावण्यासाठी महिलांनी बचत गट व मायक्रोफायनान्स चे कर्ज घेतले. काही कर्ज वेळेवर फेडले गेले मात्र लॉकडाऊन मुळे आवक नसल्याने हप्ता भरायचा कुठून? असा प्रश्न उपस्थित राहत होता. या प्रकारमुळे घरातील सदस्य मानसिक ताणात आहे. यातच कुटुंबासह आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले. त्यावर उपाययोजनाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे कर्ज केंद्रसरकारने माफ करुन त्यांना या ओझ्यातून मुक्त करावे, या मागण्या घेऊन दि पीपल्स फाउंडेशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयम महिला बहुउद्देशीय संस्था, जननायक फाउंडेशन, छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. दि पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गायत्री सोनवणे, फिरोजा शेख, सागर कोळी, आयशा मणियार, चारूलता सोनवणे, मीरा सोनवणे, गुलाब मिर्झा आदी उपस्थित होते.