<
जळगांव(चेतन निंबोळकर)- पाळधी येथील अर्चना सूर्यवंशी या नोबल इंटरनॅशनल स्कूल व सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या नोबल इंटरनॅशनल स्कूलची स्थापना ८ मार्च २०१७ मध्ये झाली असून जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणाचा विडा उचलला.
ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न आज सुटले आहेत असे नाही, पण पूर्वीपेक्षा परिस्थितीत किती तरी बदल होत आहे. ताठ मानेनं जगू पाहणाऱ्या या स्त्रीला आधार देणं आणि शहर व गावातील स्त्री जीवनातील दरी कमी करणं ही आज काळाची गरज आहे.
यासाठी ते नेहमी ग्रामीण भागातील महिलांचे समुपदेशन करुन त्यांना शिक्षित करत असतात. तसेच त्यांनीपैशांअभावी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहणाऱ्या ३० गरजू मुलींना शैक्षणिक दत्तक घेतले असून त्यांचा सर्व वार्षिक शैक्षणिक खर्च ते करतात. तसेच त्या सूर्या फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.