<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील भारती रवींद्र काळे(पाथरवट) या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका असून स्वप्न साकार फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना व बेरोजगार मुलींना रोजगार दिला आहे.
महिलांना आरोग्य विषयी प्रशिक्षण व आरोग्य विषयक जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाओ या चळवळीत सक्रिय सहभाग, कंपनीत महिलांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिराचे आयोजन, पर्यावरण चळवळ, कोरोना काळात गरजू रुग्णांना औषधं, जेवण वाटप तसेच कोविड काळात रोजगार गेलेल्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला. अश्या प्रकारचे सामाजिक कार्य ते आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतात.
तसेच येणाऱ्या काळात हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचा मोठ्या प्रमाणात विस्तार करायचा असून या माध्यमातून महिला व मुलींना मोठ्या स्तरावर प्रशिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.