<
जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे पालक-शिक्षक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पाडण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेली पालकांची देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेली आजी आजोबा व विद्यार्थी यांची अंताक्षरी तसेच विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा रंगभरण स्पर्धा तसेच हस्ताक्षर स्पर्धा यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
पालकांच्या गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- वेदांत नाईक व पालक, द्वितीय- एंजल वानखेडे व पालक, तृतीय- मानव राजहंस व पालक तर उत्तेजनार्थ आर्य राठोड व पालक, आजी-आजोबांच्या स्पर्धेमध्ये प्रथम- ओम सोनार द्वितीय- पलक कासार, तृतीय- शर्वरी खैरनार व त्यांचे आजी आजोबा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळेच्या उपशिक्षिका स्वाती पाटील व आदर्श सेवा पुरस्कार प्राप्त शाळेचे शिपाई सुधीर वाणी यांना यावेळी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी पालक-शिक्षक संघाचे सदस्य पल्लवी फेगडे, सुनील येवले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, सरला पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व शालोपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तर प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.