<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील ज्योती राणे या धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साळवा नांदेड येथे कार्यरत असून त्या शैक्षणीक कार्यासह समाजाचं ऋण म्हणून मोठ्या स्तरावर सामाजिक कार्य करत असतात. जागर स्त्री शक्तीचा! या उपक्रमाखाली त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
त्या गेल्या १८ वर्षापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी सतत नवनवीन प्रयोग करीत असून डिजिटल बॅनर, तरंगचित्रे ई लर्निग प्रोजेक्टर द्वारा अध्यापन प्रश्न मंजुषा ज्ञानरचनावाद, हस्तपुस्तिका, प्रकल्प, डिजिटल शैक्षणीक व्हिडिओ निर्मिती you tube, कृती संशोधन तसेच भरपूर प्रमाणात शैक्षणीक साहित्य निर्मिती केली असून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवित आहे शाळा श्रेणीत वाढ केलेली असून नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजन करीत असून विविध शिक्षण उपक्रम, स्पोकन इंग्लिश उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर. लोकसहभागातून शाळेसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करुन दिला.
स्वच्छता अभियान, प्लॅस्टिकमुक्त शाळा, मतदान वाढीसाठी जनजागृती पथनाट्ये, पल्स पोलिओ अभियान, डेंग्यू जनजागृती, ध्वजनिधी संकलन, हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी पथनाट्ये सादर. गरीब होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणीक दृष्ट्या आर्थिक मदत, तंबाखूमुक्त कार्यक्रम, परसबागनिर्मिती, गांडूळखत प्रकल्प, इत्यादी उपक्रम राबविले आहेत.मुल्यवर्धन प्रेरक म्हणून मुल्यवर्धन उपक्रम यशस्वीरीत्या जिल्ह्यात व तालुक्यात राबविला त्यासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या तर्फे त्यांना गौरविण्यात आले आहे.
तसेच आपण समाजाचं देणं लागतो हा उद्देश ठेऊन कोरोना काळात लॉकडाऊन सुरु असताना काम बंद असल्याने अनेक कुटुंबांचे काम बंद होते त्यावेळी मोहाडी रोड जळगावला लागून झोपडपट्टी येथे त्या कुटुंबांना किराणा घेऊन वाटप केले. कॉलनीत अस्वच्छ काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे वेतन नसल्याने किराणाची मदत केली. तसेच मेहरूण जळगांव भागातील कुटुंबांना कोरोना काळात मास्क वापरण्याची पद्धत, घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करुन मास्कचे वाटप केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना काळात घ्यावयाची काळजी व खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे घरी जाऊन गटागटाने अध्यापन केले व ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनें अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेतली. तसेच महिलांना बचत गट यांना विविध उद्योग करण्यास प्रबोधन केले बचत गटाच्या माध्यमातून कसा रोजगार मिळेल या विषयी मार्गदर्शन केले. ज्या माता भगिनींना सही करता येत नाही अशा माता भगिनींना मार्गदर्शन करून सही शिकविली. तसेच वृक्षरोपण स्मशानभूमी मेहरूण, नेरी नाका जळगाव, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, चष्मे वाटप, गरीब विद्यार्थिनींना आथिर्क सहकार्य, शिलाई मशिन वाटप फराळ वाटप, पर्यावरण पूरक कापडी पिशव्या वाटप अशा विविध नारी शक्तीग्रूपच्या माध्यमातून कार्य अविरतपणे सुरु आहे.