<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने अल्पदरात शासकीय योजना शिबीर तसेच जेष्ठ नागरिकांच्या सहाय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर उपक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाने तर जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे, जळगांव तालुकाध्यक्ष दिलीप साळुंखे, आदिनाथ पालवे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयात नागरिकांना होणाऱ्या अडचणी तसेच किरकोळ कारणासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात आयुष्यमान भारत जनधन योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, ई श्रम कार्ड योजना, जेष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवासासाठी अर्धे तिकीट, ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन, मतदान कार्ड व दुरुस्ती यासह आदी योजना नागरिकांसाठी अल्प दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. शिबीराचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन रितेश नेवे मो.८६५७५१२६६५, कन्हैया मोरे मो.८३२९५५५३२८ यांच्यावतीने करण्यात आले आहे.