<
जळगांव(प्रतिनिधी)- एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बांभोरी, जळगांव येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के. पटनाईक यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्राचार्य डॉ. जी.के. पटनाईक यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाचे सवय लावावी असे प्रतिपादन केले. तसेच उप प्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन कार्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी “झेप अवकाशी अग्निपंखची” या पुस्तकाचे वाचन ग्रंथपाल डॉ. सुधीर एस.पाटील यांनी केले या ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचनासाठी विविध पुस्तके ठेवण्यात आले.
यावेळी उप प्राचार्य डॉ.एस.पी. शेखावत, डॉ.एस.आर. सुरळकर, डॉ. एम. पी. देशमुख, प्रा. एम.व्ही.रावलानी, डॉ.पी.एच. झोपे, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, प्रा.पी.डी. पाटील, डॉ.सुधीर एस. पाटील(ग्रंथपाल), प्रा.एन.एम.काझी(विद्यार्थी विकास अधिकारी) तसेच ग्रंथालय कर्मचारी भटू पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी प्रा एन. एम. काझी. यांनी सूत्र संचालन व डॉ. सुधीर एस.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.