<
जि.प.कानळदा(मुलांची)शाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती
जळगांव(प्रतिनिधी)- गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशाने जळगाव तालुक्यातील कानळदा येथील जिल्हा परिषद शाळा कानळदा(मुलांची) येथील विद्यार्थ्यांनी स्वतः शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या.तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन केले.कार्यशाळेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उदघाटन शा.व्य.स.अध्यक्ष विनोद सपकाळे यांच्या हस्ते झाले. छाया पाटील यांनी शाडू मातीची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव या विषयावर माहिती दिली.कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारल्या १ली ते ४थी तील १८०विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. संदीप पाटील यांनी संयोजन केले.भास्कर टोके,अशोक सैंदाने,योगिता शिंदे, श्रद्धा पाटील,संध्या पाटील व सर्व माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.