<
सिन्नर(प्रतिनिधी)- सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्ड्रन व यूनिसेफ संस्थेने आपले भवितव्य आपल्या हातात आहे. आपण एकत्र पुढे जाऊया या उद्देशाने महाराष्ट्रात हात धुणे मोहिम आयोजीत करण्यात आली.
सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे व गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली CYDA संस्थापक मॅथ्यू मट्टम व संचालक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुक्यात जागतिक हात धुणे दिवस साजरा करण्यात आला.
या दिवसाचे औचित्य साधून यावेळी तसेच कार्यक्रम प्रसंगी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच गावतील, शाळेतील, मध्ये हाथ धुणे का गरजेचे असते. तसेच वेळो वेळी हाथ धुणे महत्व तसेच हाथ धुण्याचे पद्धतीचे प्रत्यक्षिक करण्यात आले. तसेच विविध मनोरंजनात्मक खेळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यात आली. तसेच स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तालुक्यातील सिन्नर पंचायत समिती, तहसील कार्यालय भोकणी, सायाळे, उजनी, मिठसागरे, वंडांगळी, कोमलवाडी, किरतांगळी, मऱ्हळ, वपांगरी-बु.गावातील समुदाय, विद्यार्थी, मुख्यधापक, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थानी सहभाग नोंदवला.
उपक्रम सिन्नरचे प्रकल्प समन्वयक योगश पाटील तसेच यशस्वीरित्या राबवण्यासाठी भाऊसाहेब शेळके, ऋतुजा काळे, अक्षय चिने, विशाल बोंबाटकर, मृणली पिंपालकर, सोमनाथ पगार, संकेत चतुर, सूरज वाघ, दीपक जगताप, कृष्ण शिंदे, पवन आहेर, मल्हारी साळवे, प्रवीण कळसकर यांनी परिश्रम घेतले.