Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील कायमस्वरुपी विद्युत रोषणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील कायमस्वरुपी विद्युत रोषणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई(प्रतिनिधी)- दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून विद्युत रोषणाईचा हा प्रकल्प साकारला आहे. यावेळी पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार श्री. राहूल शेवाळे, आमदार श्री. सदा सरवणकर, महानगरपालिका सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे व सर्व मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणाऱ्या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे स्थित १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱया नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धारासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आपले आरोग्य आपल्या हाथी; CYDA जागतिक हाथ धुणे दिवस साजरा

Next Post

स्वातंत्र्याच्या लढ्यात : कोकणाचे योगदान -डॉ.गणेश मुळे

Next Post
स्वातंत्र्याच्या लढ्यात : कोकणाचे योगदान -डॉ.गणेश मुळे

स्वातंत्र्याच्या लढ्यात : कोकणाचे योगदान -डॉ.गणेश मुळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d