<
बुलढाणा, (प्रतिनिधी) – राज्यात विधी विद्यापीठ, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विदयापीठ यासह अजून राज्यात दोन ठिकाणी असे एकूण नवीन चार विद्यापीठ उभारण्याची गरज असून नव्याने विद्यापीठ उभारण्यासाठी ‘ महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासू) राज्यभर लढा उभारणार असल्याचं प्रतिपादन मासूचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी आज दि.१४ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील आयोजित कार्यक्रमात केले.
उपस्थित विदयार्थ्यांना संबोधित करत असतांना पुढे बोलतांना ऍड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ‘मासू’ संघटना संपूर्ण राज्यभर काम करत असून ‘मासू’ संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करते, विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास न्यायिक लढाई देखील लढते त्यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांनी आता काळजी करण्याचे कारण नाही, तुम्ही फक्त तुमच्या हक्कासाठी एकत्र या असं आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.तसेच आगामी काळात सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करण्यासाठी ‘ लोक हित कारणी सभा’ या संघटनेची स्थापना करण्यात येणार असून यापुढे आपण सर्वांनी जागरूक नागरिक, मतदार म्हणून सामाजिक, राजकीय विषयावर भाष्य करण्यासाठी पुढे यावे असं ते यावेळी म्हणाले.
मासिक ‘संगर’ असणार मुखपत्र
संघटनेचा विचार जनते पर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेचे मुखपत्र असणं आवश्यक असतं म्हणूनच आता ‘संगर ‘ मासिक सुरु करणार असल्याची घोषणा ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी यावेळी केली.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासू) संघटनेचा २ रा वर्धापन दिन व सहकारी मेळावा साजरा करण्यात आला होता या मेळाव्याला बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे , कार्यअध्यक्ष ऍड .सुनील देवरे, सचिव ऍड. अरुण चव्हाण, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रविण सपकाळे,परेश चौधरी जिल्हा अध्यक्ष ठाणे, करिश्मा अन्सारी तालुका अध्यक्ष भिवंडी इ. उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांचा झाला पदग्रहन सोहळा
संघटनेच्या 2 रा वर्धापन दिना निमित्त आयोजित सहकारी मेळाव्या मध्ये बुलढाणा जिल्ह्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली तर नूतन पाधिकाऱ्यांना संघटनेच्या ध्येय धोरण बाबत शपथ देण्यात येउन सन्मानपूर्वक पदग्रहण सोहळा पार पडला.
अशी असेल नूतन कार्यकारणी…
जिल्हाध्यक्ष – शेख मोबिन,
जिल्हा सचिव-हारिस सुरत्ने, जिल्हा कार्यकारणी सदस्य-नबा उकर्डे,
संग्रापुर तालुका कार्यकारणी समिती गठीत करण्यात आली ती खालील प्रमाणे अध्यक्ष-तौसिफ जमदार,उपाध्यक्ष-अयाज मिर्झा,सचिव-सरीन सुरत्ने,
सहसचिव-वैभव भामदरे,प्रसिध्दी प्रमुख-हुसेन केदार,कार्यकारणी सदस्य-धर्मजित सुरत्ने,कार्यकारणी -सलमान सुरत्ने,कार्यकारणी सदस्य-सादिक जाफर सुरत्ने अशी आहे.