<
नाशिक(प्रतिनिधी)- ब्रह्माकुमारी संस्थेच्या म्हसरूळ, कला नगर येथील मुख्यसेवाकेंद्राच्या नूतन वस्तूची निर्मिती करण्यात आली. या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत. सोबतच येथील उपक्षेत्रीय संचालिका राजयोगिनी बाल ब्रह्मचारिणी ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. ह्या दोन्ही दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून येथील ब्रह्माकुमारी साधकांनी दिदिजींचा अमृत महोत्सव व प्रभू प्रसाद वास्तूचा १३वा वर्धापन दिन मोठ्या हर्शोलासात संपन्न केला. या प्रसंगी भाजपा सचिव नाशिक महानगर अमित घुगे, समन्वयक शिवसेना पंचवटी विभाग सुनील निरगुडे, PNB बँक उपव्यवस्थापक अनघा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीदींना सन्मानित केले.
ब्रह्माकुमारी वासंती दिदिजी यांच्या कार्याचा घेतलेला धावता आढावा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सन १९३६ पासून कार्यरत असून मुख्यालय माउंट आबू (राजस्थान) येथे आहे. संस्थेची 137 देशात ९००० पेक्षा अधिक सेवाकेंद्र व उपसेवाकेंद्र कार्यरत आहेत. संस्थेला राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. यात युनोतर्फे (संयुक्त राष्ट्रसंघ) संस्थतेला ७ शांतीदूत पुरस्कारांनी स्नमानित करण्यात आले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ईश्वरीय संदेश प्रसारित व्हावा यासाठी संस्थे अंतर्गत मिडिया विंग, ज्युरीस्ट विंग, वूमन विंग अशा विविध २० प्रभागांची स्थापना करण्यात आली असून नाशिक येथील उपक्षेत्रीय संचालिका वासंती दिदिजी या प्रशासक विंगच्या राज्य समन्वयक आहेत.
१८ जानेवारी १९६९ रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी संपूर्ण अवस्था प्राप्त करून आपला स्थूल कलेवर सोडून सूक्ष्मवतन मध्ये प्रस्थान केले. येथूनच ब्रह्माबाबा यांनी आपले अव्यक्त व अलौकिक कार्य पुढे स्रुरू ठेवले . बाबांच्या जाण्याने संस्था थांबली तर नाहीच परंतु यानंतर ब्रह्माकुमारी संस्थेचा चहूबाजूने विस्तार झालेला दिसतो. अनेक साधक त्यानंतरच्या काळात ब्रह्माकुमारी संस्थेसोबत जोडल्या गेली. अनेक बाल ब्रह्मचारी कन्यांनी आपले जीवन ईश्वरीय कार्यात समर्पित केले. यातच एक दैदिप्यमान कुमारी म्हणजे ब्रह्माकुमारी वासंती ह्या होत्या. त्यांनी मुंबई येथून बीए इकॉनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर आपले जीवन १९७३ च्या काळात समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले.
कुमारी वासंती यांना लहानपणा पासूनच वाटत असे की आपण जीवना मध्ये नवीन काहीतरी करून दाखवावे. आपले जीवन महान बनून आपल्या हातून जनसेवा घडावी ह्याच विचारांनी त्यांनी स्वतःला ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडले. ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय झाल्यानंतर त्यांची आध्यात्मिकते बदल रूची वाढू लागली. जवळपास १९७३ पासून दिदी राजयोगाचा नियमित अभ्यास करीत होत्या. या राजयोग ध्यान साधनेतुन त्यांचे आत्मबल, आत्मविश्वास वाढत गेला. ब्रह्माकुमारी जीवनात आल्या नंतर त्यांच्यात पवित्रता, सादगी, प्रेम, करुणा आदी गुणांचा विकास होत गेला. नियमित राजयोगाच्या अभ्यासामुळे मनाची शांती, एकाग्रता, स्थिरता, दृढता आणि मानसिक शक्तींचा विकास होत असल्याचा अनुभव झाला. दिदींना राजयोगाद्वारे । परमात्म शक्तीची ओळख तसेच परमात्म्याच्या गुण शक्तींची अनुभूती देखील झाली. ईश्वरीय गुणांना जीवनात धारण करत असतांना दैवी संस्कारांचा विकास खूप सहज रितीने होवू लागला. विश्वसेवा तसेच सर्व मनुष्य आत्म्यांचे जीवन परिवर्तन करण्याच्या विचाराने दिदींनी आपले जीवन ब्रम्हाकुमारी संस्थेमध्ये समर्पित केले.
ईश्वरीय सेवेत समर्पित झाल्यानंतर ब्रह्माकुमारी ब्रम्हाकुमारी वासंती यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिल्या. त्याप्रमाणे अनेकनेक लोकांच्या संपर्कात येण्याचा व त्यांची सेवा करण्याची संधी देखील त्यांना मिळाली. मुंबई सेवाकेंद्रा पासून ते अहमदाबाद, औरंगाबाद, पनवेल, सोलापूर, नागपूर, लातूर, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेवा त्यांनी दिल्या.
१९८९ च्या काळात नाशिक येथील संचालिका ब्रह्माकुमारी गीता दीदी यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर नाशिकची धुरा सांभाळण्यासाठी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांना संचालिका पदावर नेमण्यात आले.
आपल्या संचालक पदावरून सेवा देताना दीदींजीनी नाशिक सेवा केंद्राचा चहू बाजूनी विस्तार केला. त्यांच्या कार्यकाळात अनेक उपसेवा केंद्र व गीता पाठशालाची निर्मिती केली. संस्थेचा हा नाशिक येथील विस्तार बघून संस्थेच्या क्षेत्रीय संचालिका ब्रह्माकुमारी संतोष दादिजी यांनी नाशिक सेवा केंद्राला उपयोग क्षेत्रीय सेवा केंद्राचा दर्जा देऊन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी ह्या क्षेत्रीय संचालिका म्हणून नाशिक विभागाचे कार्य सांभाळू लागल्या.
गेल्या ३२ वर्षांपासून वासंती दीदीजी नाशिककरांची निष्काम वृत्तीने सेवा करीत आहेत. नाशिक सेवाकेंद्रामध्ये सेवा देत असतांना दिदींनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना ईश्वरीय संदेश पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या सेवांचे आयोजन केले. दिदिजींच्या करकिर्धीत कुंभ नागरी नाशिक मध्ये १९९२, २००३ व २०१५ अश्या ३ कुंभमेळाच्या सेवेचे सफल नियोजन करण्याचे भाग्य लाभले. या कुंभ काळात नाशिक मध्ये भव्य आध्यात्मिक मेळ्याचे आयोजन करून लाखोंच्या संख्येत जनतेला ईश्वरीय संदेश पोहचविला.
जीवन जगण्याची कला व जीवनात खऱ्या मार्गावर चालून जीवन श्रेष्ठ बनविण्यासाठी दिदींनी लाखोंना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयातर्फे एक विशिष्ट थीम घेवुन ते वर्ष साजरा केले जाते. या प्रकल्पांचे सफल आयोजन दीदीजी आपल्या नाशिक शहरात करीत असतात. यात विश्वशांती वर्ष, महिला वर्ष, युवावर्ष, विश्वयोगदिन इत्यादिचा उल्लेख करता येईल. स्थानीय स्थरावर दिदीजी दर वर्षी विविध अभियानांचे आयोजन करतात. यात आजपर्यंत सायकल यात्रा, मोटरसायकल रॅली, महिला संमेलन, धर्मसर्मेलन, व्यसनमुक्ती अभियान, ड्राइव्हर्स, कन्डक्टरर्ससाठी तणावमुक्त जीवनावर प्रवचने, असे कीती तरी कार्यक्रमांचे आयोजन दिदीजी आपल्या कार्यक्षेत्रात करीत असतात.
दिदींनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या एज्युकेशन विंग द्वारा नाशिक मध्ये अनेक सेवांचे प्रोजेक्ट कार्यान्वीत केले. यात अतिशय उल्लेखनिय म्हणजे यशवंतराव चव्हाण मक्त विद्यापीठशी संलग्न असलेला यश ब्रह्मा प्रोजेक्ट होय. या कोर्स च्या माध्यमातून आज फक्त ब्रह्मकुमारी साधकच नव्हे तर महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतातील मराठी जाणणारे अनेक लोक या अध्यात्म व मूल्य शिक्षण या कोर्स शी जोडले गेलेले आहेत. हा कोर्स करून ते स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवत असून अनेकांना आपल्या नोकरी मध्ये या कोर्स चा उपयोग झालेला असल्याचे अनेकांनी आपल्या अनुभवात सांगितले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात हा कोर्स सुरू करण्यात वासंती दिदीजी यांचा मोलाचा वाटा आहे.
‘माझा भारत हरित भारत’ अभियानाच्या अंतर्गत देशात २० लाख ५८ हजार आणि महाराष्ट्रात ६ लाख रोपांची लागवड प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने केली आहे. या अभियानात नाशिक जिल्हा अव्वल ठरला होता. जिल्ह्यात २३ हजार ३२० रोपांची लागवड करण्यात आली होती. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक सेवा केंद्राच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी वासंतीदीदी यांना विशेष सत्कारित करण्यात आले होते.
अशा या कर्तव्यदक्ष व सदा तत्पर अशा योगिक सेनानींचा दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोजी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. ब्रह्माकुमारी साधकांन तर्फे व नाशिकच्या सर्व स्तरातील विविध मान्यवरांतर्फे दीदीजींचा सन्मान करण्यात आला.