<
मुंबई(प्रतिनिधी)- मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.विज्ञानाचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यास विद्यार्थ्यांना त्याची गोडी निर्माण होईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे, मराठी विज्ञान परिषदेचे डॉ.जयंत जोशी, कोकण विभागाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास सामंत, विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर, विज्ञान शास्त्रज्ञ डॉ.अरविंद रानडे, डॉ.माधव राजवाडे, अभिजित मुळ्ये आदी उपस्थित होते.