Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती -संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे आदेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती -संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे आदेश

मुंबई(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.राज्य शासनाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहेत. परीक्षा ‘न्यासा कम्युनिकेशन कंपनी’ मार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक अधिकारी यांची प्रत्येक परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिमंडळाच्या कार्यालयास भेट द्यावी. परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात. परीक्षेच्या तयारीबाबत दररोज आढावा घ्यावा, समस्या असल्यास स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, परीक्षा केंद्र व्यवस्थित आहेत का, तेथे परीक्षार्थींना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या आहेत का, याबाबत तपासणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल जामर्स बसवले आहेत का, स्ट्रॉंग रुमची व्यवस्था झाली आहे का, कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होते का, याबाबत पाहणी करायची आहे. संबंधित कामकाज होईल याकडे लक्ष द्यायचे आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

नियुक्त अधिकारी, पद आणि त्यांना दिलेले परिमंडळ 1) डॉ. विजय डेकाटे, प्राचार्य, कुटुंब कल्याण आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे – पुणे परिमंडळ2) डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आयटीसी ब्युरो, पुणे – ठाणे परिमंडळ3) डॉ. डी. एम. गायकवाड, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे- नाशिक4) एम. एम. मोरे, आरोग्य सेवा (परिवहन), पुणे – कोल्हापूर5) डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक (शुश्रुषा), मुंबई – औरंगाबाद6) डॉ. आर. एस. आडकेकर, सहसंचालक, पुणे – लातूर.7) डॉ. उमेश नावाडे, प्राचार्य, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर – अकोला8) डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक (नेत्र), मुंबई – नागपूर

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील -मंत्री जयंत पाटील

Next Post

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आखली रणनीती; ना.एकनाथ शिंदेंनी केला गुप्त दौरा

Next Post
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आखली रणनीती; ना.एकनाथ शिंदेंनी केला गुप्त दौरा

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आखली रणनीती; ना.एकनाथ शिंदेंनी केला गुप्त दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d