<
जळगांव(प्रतिनिधी)- दिवाळीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तानी फटाक्यांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्ती नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यामुळे नागरिकांची यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल.
फटाके बंदीच्या निर्णयाने फटाके विक्री करणाऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. त्यानंतर विभागीय आयुक्तानी फटाके विक्री बंदचे पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आता फटाके विक्री बंदचा प्रस्ताव फेटाळल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.