Monday, May 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार -वने राज्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार -वने राज्यमंत्री

मुंबई(प्रतिनिधी)- चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक( नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) नागपूर जीत सिंग, व्यवस्थापकीय संचालक बांबू विकास मंडळ श्रीनिवास राव, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक श्रीमती अभरना, चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर,वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, चंदन उद्योजक वदीराज मदभावी या बैठकीला उपस्थित होते.

वने राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल.चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेवून जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील. चंदन पावडर,तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल.

या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल याचीही पाहणी वने विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी स्पष्ट केले.यावेळी चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली. यावेळी चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी चंदन उद्योगात महाराष्ट्राला असलेल्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चंदनाची मागणी, चंदन उद्योजकांना शासनाकडून हवे असलेले सहकार्य याबाबतीत सविस्तर सादरीकरण केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

Next Post

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसित करावी -वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post
तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसित करावी -वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसित करावी -वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d