<
मुंबई(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 7 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाने दिली आहे.
राज्यातील सर्व खेड्यांपर्यंत मोफत विविध सेवा व विधि सेवेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, त्या योजनांमधील लाभार्थी याची माहिती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी विधि सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात जिल्हानिहाय, तालुकानिहाय कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, यामध्ये विधि साक्षरता शिबिरे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, भित्तीपत्रके, अशा कार्यक्रमांचा समावेश असून, संबंधित कार्यालये जिल्हा विधि सेवा प्राधिकरणासोबत समन्वय साधून हे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती राज्य विधि सेवा प्राधिकरण यांनी दिली आहे.