<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे हे होते.
सर्वप्रथम महर्षी वाल्मिकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महर्षी वाल्मिकांचा “वाल्या” ते “वाल्मिकीचा” प्रवास उलगडला. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, ए. एस. बाविस्कर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख टी. एन. भोई तर आभार एस. डी. राजपूत यांनी मानले. याप्रसंगी श्रीमती. पी.व्ही. बाविस्कर, श्रीमती. एस.आर. शिरसाटे, पी.बी. मेढे, व्ही.एन. नारखेडे, आर.ए. कोळी, आर.जी. जाधव, ए.डी.पगारे, वाय.पी. सोनवणे, डी.बी. सोनवणे, कैलास म्हसाने, विशाल सोनवणे, सागर हिवराळे यांची उपस्थिती होती.