<
पाचोरा येथील गांधी चौकातील श्री सुरेश उर्फ नाना देवरे यांची कन्या वैशाली जडे लहानपणापासून स्टंट तिला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची आवड, शिक्षण घेत असताना शाळेमध्ये मुलींची कबड्डी स्पर्धा, खो खो स्पर्धा, रांगोळी काढणे अनेक खेळात तरबेज सर्वांची मनमोकळेपणाने बोलणे शाळेतही शिकत असताना विद्यार्थी-विद्यार्थिनींची मॉनिटर म्हणून योग्य जबाबदारी पार पाडली.
शाळेत असताना सुद्धा रुबाबदारपणा भारदस्त शरीर वर्गात मुलांना व मुलींना योग्य शिस्त लावणे, शिक्षकांना नेहमी सहकार्याची भूमिका दाखवणाऱ्या वैशाली जडे दहा वर्षाच्या असतानाच आपले गांधी चौकातील सराफी दुकान स्वर्गीय रूपचंद भावडू शेठ देवरे या नावाची दुकान असून त्यांना दुकानात बसण्याची आवड होती. त्यामुळे दुकानाची जबाबदारी भाऊ संतोष देवरे याच्यावर आली तरी वैशाली देवरे आपल्या भावाच्या बरोबर उभे राहून जबाबदारी पार पाडत आहे. तसेच जनसेवेचा वारसा हा वैशालीला तिच्या वडिलांकडून म्हणजेच नानासो सुरेश देवरे यांच्याकडून मिळाला.
वैशाली जडे तिचे वडील श्री नानासाहेब देवरे बांबरुडकर स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांचे खंदे समर्थक नानासाहेब यांना आप्पासाहेबांनी पाचोरा तालुका शिक्षण संस्था या ठिकाणी संचालक म्हणून तसेच गांधी चौक परिसरात नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यामुळे नानासाहेबांची जबाबदारी वाढली दुकानाची जबाबदारी वैशाली जडे तिच्यावर सोपवली त्यामुळे वैशाली जडे यांचा प्रत्येकाशी संपर्क येऊ लागला त्यामुळे हळूहळू सामाजिक कामाची तिला ओढ लागली त्यामुळे त्यांना पाचोरा तालुका महिला सुरक्षा संघटन सचिव पद देण्यात आले.
सोनार समाजातील सुवर्णकार तसेच तनिष्का ग्रुप सदस्य या ग्रुप मार्फत महिलांचे प्रश्न सोडविणे, महिलांना न्याय देणे, पती-पत्नीमध्ये वाद असल्यास समझोता करून मिटवणे 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी गांधी चौकातील हुतात्मा स्मारकाला पूजन करून झेंडा वंदन करणे तसेच नवरात्र मध्ये नवदुर्गा देवी माता यांच्या मिरवणुकीत सामील होऊन आनंद व्यक्त करणे, कॉलेजमधील युवतींना मार्गदर्शन करणे,शिवजयंतीच्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून वंदन करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूजन करून पुष्पहार घालून वंदन करणे आदी सामाजिक कार्य ते करत असतात.
वैशाली जडे कोरोना काळातही न घाबरता सर्व महिला वर्गांला धीर देऊन कोरोना काळात नगरपालिके मार्फत आपल्या परिसरात निर्जंतुकीकरन फवारणी केली. जागतिक महिला दिनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले, राजकारण असो समाजकारण महिलांनी पुढे यावे हा संदेश त्यांनी दिला. सांगली येथील महापूर आला असता महिलांना सोबत घेऊन प्रभात फेरी काढून सर्व प्रकारचे किराणा साहित्य व त्या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू जमा करून स्वतः तेथे जाऊन सांगली व किर्लोस्करवाडी येथे ज्यांना खरोखर गरज होती ज्यांचे नुकसान झाले अशा गरजू व्यक्तींना मदत केली.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देखील मिळाला तसेच वैशाली जडे यांची बारामती येथील श्रद्धा आश्रम या आश्रमाचे प्रमुख सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पाचोरा शहरात एक महिला म्हणून वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.कोणाच्या अडीअडचणीत संकटाच्यावेळी क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावुन जाणे, निर्भिडपणे आपले कर्तव्य बजावने, अश्या अनेक गुणांनी संपन्न अशी वैशुताई…
शब्दांकन -(अनिल आबा येवले)