<
जळगाव दि.23- के.सी.ई सोसायटी संचलित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव, येथे प्राध्यापकांसाठी “आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पाच दिवसीय फॅक्लटी डेव्हलपमेंट कार्यशाळे” चे आयोजन दिनांक २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे.”इंडस्ट्री 4: चॅलेंजेस बिफोर एज्युकेशन ” औद्योगिक गरजा आणि आव्हाने पेलणार्या शिक्षण पध्दतीशी निगडित विविध पैलूंवर मार्गदर्शन आणि चर्चा या कार्यशाळेत होणार आहे.
टेकनॉलॉजी इव्हॅल्युऐशन, एनबीए एक्रिडिटेशन आणि चॅलेंजेस, नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी, मॅनेजिंग द सेल्फ, अडॉप्ट,ऍडीप्ट: बिकम अ फ्युचर- रेडी, इंडस्ट्री-अकॅडेमिया कॉन्वेर्जेन्स अशा विविध औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्वाकांक्षी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यशाळेसाठी मुंबई, वल्लभ विद्यानगर, एसपी विद्यापीठ गुजरात, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ तसेच राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरांवरील तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यात मुख्यत्वे डॉ. कामिनीबेन शाह , डॉ मोहन अग्रवाल, डॉ सोनाली टिपरे, हरीश शेट्टी, डॉ सुनील पाटील, डॉ विजय कांची, प्रतीक हक, प्रो.डॉ.अनिल डोंगरे, प्रो. आशुतोष मिसळ आणि प्र. कुलगुरु डॉ बी.व्ही. पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम दोन सत्रात आयोजित करण्यात आला असून उत्तम प्रतिसाद त्यासाठीं मिळत आहे. उ. म. वि. परीक्षेत्रातील प्राध्यापकांनी ही जास्तीत जास्त संख्यने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन के सी ई आय.एम.आर.च्या संचालक प्रा. डॉ शिल्पा बेंडाळे ह्यांनी केले आहे. ह्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक सुरु आहे. अधिक माहिती साठी संपर्क ९८८१३७६२१२, ९०४९७७४२०२ साधावा.