<
जळगांव(प्रतिनिधी)- डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदुत यांनी आपल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव(RAWE) रूरल ऍग्रीकल्चर वर्क एक्सपरिइन्स या कार्यक्रमाअंतर्गत कोविड-19 ची परिस्थीती असल्याने शेतकरी बंधू साठी ऑनलाईन कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
या मेळाव्यासाठी त्यांनी तृप्ती हर्बल ऍग्रो चे सी.ई.ओ.डॉ मच्छिंद्र मुंडे यांना प्रमुख पाहुणे म्हणूनआमंत्रित केले होते.या मेळाव्यात शेतकरी बंधुना डॉ.मुंडे सरांनी औषधी वनस्पती लागवड व्यवस्थापन व करार शेती या बद्दल अतिषय विस्तृत अश्या पद्धतीने मार्गदर्शन केले.त्यांनी शेतकऱ्यांना विशेष औषधी वनस्पतींची माहिती देऊन त्यांचे लागवड व व्यवस्थापन या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना कृषिश्री.रुपेश भोळे यांनी केली तर आभार प्रदर्शन कृषिश्री. हेमंत खडसे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयातील कृषिदुत निलेश देवरे,हितेश बाविस्कर,मित्तल भोगे, अभिनय पाटील,हेमंत खडसे,रुपेश भोळे व मोहित गढरी यांनी केले होते.या साठी त्यांना डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे सर,प्रवीण देवरे सर,कार्यक्रम समन्वयक ए.डी. फापळे सर,कार्यक्रम अधिकारी व्ही. एस. राणे मॅडम व बी.बी.मुंडे सर व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.