Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ई ट्रायसिकलमुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भर होतील -डॉ.राजेंद्र शिंगणे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
23/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
ई ट्रायसिकलमुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भर होतील -डॉ.राजेंद्र शिंगणे

बुलडाणा(जिमाका)- महिला आर्थिक विकास महामंडळ च्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना ई ट्रायसायकलचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे दिव्यांग बांधव स्वतः च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील. सदर ट्राय सिकलचे वाटप दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचं पहिलं पाऊल असून यामुळे दिव्यांग निश्चितच आत्मनिर्भर होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री दिव्यांगांना ई ट्रायसायकल वाटप प्रसंगी बोलत होते.देऊळगाव राजा येथील आर्या लॉन्स मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत दिव्यांगासाठी ई ट्रायसायकल वाटप व विधवा महिलांना तेजश्री योजनेअंतर्गत आर्थिक मदत, लोक संचलित साधन केंद्र देऊळगाव मही वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आज २३ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले. पालकमंत्री डॉ शिंगणे पुढे म्हणाले, महिलांना आर्थिक संपन्न करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहे.

या योजनांना कधीही निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. जिल्हा नियोजन मंडळ असो किंवा राज्य शासन असो निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड नाझेर काजी होते. या कार्यक्रमांतर्गत 162 दिव्यांगांना ई ट्रायसायकल वाटप करण्यात आले. तसेच महिला बचत गटांना देखील धनादेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण, जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, नगराध्यक्ष सुनीताताई शिंदे, तहसीलदार श्याम धनवणे, माजी जिप उपाध्यक्ष गंगाधर जाधव, गजानन पवार, सौ सुनीता ताई सवडे, पंचायत समिती उपसभापती सौ कल्याणी ताई शिंगणे, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, राजू शिरसाट, अर्पित मिनासे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, अरविंद खांडेभराड, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी सुमेध तायडे, उपजिल्हा विकास सल्लागार विशाल पवार, लेखाधिकारी मुकुंद जहागीर, कुंदन सदाशिव, राजेश शेगोकार उपस्थित होते.

तसेच बचत गटाच्या महिला पदाधिकारी व दिव्यांग या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक सुमेध तायडे यांनी, तर संचालन विशाल पवार यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांद्वारे ऑनलाईन कृषी मेळावा

Next Post

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे -मंत्री छगन भुजबळ

Next Post
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करणार -पालकमंत्री छगन भुजबळ

सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करावे -मंत्री छगन भुजबळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo