<
मुक्ताईनगर-( प्रतिनिधी) – रुईखेडा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले.
त्या दरम्यान मुक्ताईनगर येथील न्यायाधीश वानखेडे सो. उपस्थित होते व त्यांनी लोकांना आपले हक्क व अधिकार याची जाणीव करून घेणे महत्वाचे आहे हे सांगत कायदा व सुव्यवस्था याचे मार्गदर्शन केले.
तसेच गटविकास अधिकारी राजकुमार जैन, सरकारी अभियोक्ता ॲड संतोष कलंत्री, ॲड अरुण कांडके, ॲड ललित पुजारी, संतोष कोळी,तसेच एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी ॲड आशुतोष चंदेले, ॲड चांगदेव दांडगे, ॲड कोमल काळे, संकेत राजपूत, गोविंद जाधव, सचिन पाटील, विनोद सोनवणे, सनदकुमार शिंदे, तेजस्विनी पाटील, कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, प्रेरणा मंडोरे, रुपाली वानखेडे, दीक्षा गायकवाड तसेच गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते त्या दरम्यान रॅली काढून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.