<
पारोळा(प्रतिनिधी)- येथे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आयोजित खान्देश विभागीय कलावंत एकता परिषदेची कलावंतांची बैठक उत्साहात संपन्न झाली. नवनिर्वाचित जळगाव महिला जिल्हाध्यक्षा म्हणून संगिताताई लाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच त्यांच्या निवडीचे समितीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, प्रदेश महासचिव समाधान आव्हाड, नाशिक जिल्हाध्यक्ष रमेश जाधव, संपर्क प्रमुख राजेश शिंदे तसेच समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.संगिता लाड यांनी आपल्या भाषणात समितीची धुरा सांभाळून जळगाव जिल्ह्यात कलाकारांचे न्याय हक्क मिळवून देण्याचे आश्वासन देत आपले मनोगत व्यक्त केले.