<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे.
मध केंद्र योजनेंतर्गत 2021-22 करीता वैयक्तिक मधपाळ लाभार्थ्यांना दहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण (मधमाशापालन) कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद रोड, जळगाव येथे 9 ते 18 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये योजनेनुसार एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के स्व- गुंतवणुक करणारे आणि 18 वर्षांवरील होतकरु शेतकरी, उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, शाळा सोडल्याचा दाखला, गुण पत्रक, जातीचा दाखला, सातबारा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, आय.टी.आय. जवळ जळगाव (संपर्क क्रमांक 9623578740 व 7058315110) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.