<
पाचोरा(वार्ताहर)- १नोव्हेंबर रोजी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांचा वाढदिवस असून दरवर्षाप्रमाणे यंदाही त्यांचा वाढदिवस अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार नियोजन बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवालय संपर्क कार्यालयात संध्याकाळी ७ वाजता संपन्न झाली.
यावेळी शिवसेना नेते मुकुंद अण्णा बिलदीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर, शरद पाटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.मंचावर उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक रवी केसवणी, शहर प्रमुख किशोर बारावकर, सुमीत पाटील, रहेमान तडवी, माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, नगरसेवक राम केसवाणी, दादाभाऊ चौधरी,सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे,.बापू हटकर, आनंद पगारे यांची मंचावर उपस्थिती होती.तसेच बैठकीला शहरातील सर्वच प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांची व हितचिंतकांची होणारी गर्दी लक्षात घेता रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळ सत्रा पासूनच शहरातील विविध प्रभागात झालेल्या विकास कामांचे व मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या खास आग्रहास्तव आमदार किशोर अप्पा पाटील यांचा प्रथमच शहरातील प्रत्यक प्रभागात वाढदिवसा निमित्त केक कापला जाणार आहे.तसेच रविवारी रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
तसेच सोमवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मूळगावी अंतुर्ली येथील श्री पांडुरंगांच्या व आईच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करणार असून सकाळी ९ वाजेपासून पाचोरा शहरातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात स्नेही जनांच्या भेटी साठी दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध असणार असून दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत भडगाव तालुक्यातील स्नेहीजनांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.संध्याकाळी ५ वाजता पाचोरा शहरात कै. के एम बापू पाटील व्यापारी संकुल, नगरपालिका जीन येथे जाहीर सभेचे आयोजन केले असून या सभेला महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेसह जिल्ह्याभरातील प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुकुंद अण्णा बिलदीकर व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.