<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात पोलिस दला सोबत होमगार्ड्सने नि:स्वार्थ विनावेतन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. या कार्याची दखल घेऊन होमगार्ड्स च्या सन्मानार्थ जळगाव जिल्हा पोलिस दला तर्फे आज पोलिस कवायत मैदानात कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, जिल्हा होमगार्ड्स समादेशक तथा अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या हस्ते १४० होमगार्ड्सना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी, दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले.
गृह पोलीस उपअधीक्षक विठ्ठल ससे, एटीसी विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पाटील, प्रदिप बडगुजर, प्रविण पाटील, नवजित चौधरी, राहूल बैसाणे, प्रमोद वाड़ीले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, वायरलेस विभागाचे पोलिस उप निरीक्षक संजय मराठे यांनी सहकार्य केले. पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी व सूत्रसंचालन केले.