<
२-३ दिवसांपूर्वी मुंबई येथे संदीप काळेंना भेटायला गेलो असताना सरांच्या माध्यमातून एका नवीन अवलिया उद्योजकाची भेट झाली. त्यांचे नाव संतोष जी इंगळे मुंबई मधील नवीनच नावा रूपाला आलेला इंदू वडा पाव हॉटेलचे मालक!
या माणसाला भेटून खूप छान वाटले. विशेष म्हणजे ही व्यक्ती खान्देशातील आणि आपल्याच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मधील मेहून गावाची रहिवासी आहे हे ऐकून खूप छान वाटल. “इंदू” हे त्यांच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील वारल्यानंतर मुंबई सारख्या मोठ्या शहरात हात गाडीवर वडापाव विकून दिवस काढलेली एक आई! आपल्या आई ने ४० वर्ष मुंबई मध्ये वडापाव विकून दिवस काढले आहे. तर आपल्या आईच्या नावाने या अवलियाने इंदू वडापाव नामक हॉटेल मुंबई मध्ये सुरू केलीत. या हॉटेल मध्ये हे दोघं नवरा बायको म्हणजे संतोषजी इंगळे आणि त्यांच्या मिसेस स्वतः हे सर्व बनवितात. या हॉटेलचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी बनविलेला प्रत्येक पदार्थ हा वेगळा आहे. चव अप्रतिम आहे. त्यात तुम्ही वडा पाव पासून कोंथिबीर वडी, थालीपीठ, मिरचीचे कांद्याचे भजे आणि बरच काही…
संदीप काळे सर आम्हाला तिथे घेऊन गेले. त्या व्यक्तीचा प्रवास खूप वेगळा आहे. त्यांचा एका महिन्याचा टर्न ओव्हर १ ते १.५ कोटी रु. मध्ये असतो हे ऐकून शॉक बसला. परंतु स्वतः ची मेहनत आणि आपल्या आईचे कष्ट हे डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला व्यवसाय असल्यामुळे यश प्रामाणिक मिळाले. त्या व्यक्तीने मोबाईल नंबर दिला. आदराने विचारपूस केली. आम्हाला बऱ्याच नवीन डिशेस बनवून खायला दिल्यात आणि पुन्हा कधीही मुंबई आलात तर नक्की या असे सांगितले.
लवकरच “इंदू वडापाव” आपल्याला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिसणार आहे, असे त्यांचे पुढील नियोजन आहे. आपल्या भागातील व्यक्ती मुंबई मध्ये जाऊन इतकी प्रगती केली हे बघून नक्कीच अभिमान वाटतो की आम्ही जळगावकर खान्देश वासी कुठेही कमी नाही. यावेळी आदरणीय संदीप काळे सर, माझे सहकारी दिव्या जी पाटील व योगेश जी चौधरी उपस्थित होते.