Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी; नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ इतके परिक्षार्थीची नोंदणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

नाशिक(विमाका वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा राज्याच्या १७ जिल्ह्याच्या मुख्यालयी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. तसेच गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा रविवारी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात व काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ इतके परिक्षार्थी नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी पाचही जिल्हयात एकूण १२९ शाळेमध्ये परीक्षाकरीता पूर्वतयारी करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

नाशिक विभागातील एकूण ५३ हजार ३२६ परीक्षार्थींपैकी नाशिक जिल्हयात एकूण २७ हजार ०३ नोंदणीकृत परीक्षार्थी असून ६५ शाळेमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच अहमदनगर जिल्हयात एकूण नोंदणीकृत परीक्षार्थी असून ११ शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. धुळे जिल्हयात एकूण ३ हजार १४ नोंदणीकृत परीक्षार्थी असून ६ शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्हयात एकूण ७ हजार ९९१ नोंदणीकृत परिक्षार्थी असून २७ शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयात एकूण ७ हजार १२७ नोंदणीकृत परिक्षार्थी असून २० शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. वरील सर्व परिक्षा केंद्रांवर कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आलेली असुन परिक्षार्थीनींही कोविड नियमाचे पालन करावे.

तसेच वरील सर्व १२९ परिक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्या नेमणुका मे.न्यासा कंपनीमार्फत करण्यात आल्या असुन ही सर्व प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाकडुन मे.न्यासा कंपनीस देण्यात आलेली आहे. तरी देखील गट-ड संवर्गातील पुर्वनियोजित परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, यास्तव शासनाच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे परीक्षा केंद्र निरीक्षक म्हणुन प्रत्येक केंद्रावर नियुक्त केलेले आहेत. हे निरीक्षक मे. न्यासा कंपनीच्या परीक्षा आयोजन कार्यपध्दतीवर लक्ष ठेवणार असून कोणत्याही प्रकारचा अप्रिय किंवा अपप्रकार होवू नये, याकडे बारकाईने लक्ष देणार आहेत.

नाशिक जिल्हयातील परीक्षा केंद्र क्रमांक ६०५८ (डॉ. गुज्जर सुभाष हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देवळाली कॅम्प) हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलेले असून केंद्र क्रमांक ६०७१ (जनता इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,दिंडोरी ) हे नवीन परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. जुन्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींनी नवीन केंद्रावर जाण्याचे आवाहन मे.न्यासा कंपनीद्वारे करण्यात आले आहे, असेही डॉ. गांडाळ यांनी कळविले आहे. प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्या त्या जिल्हयाकरीता भरती प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.

न्यासा कंपनीकडुन नाशिक आरोग्य परिमंडळातील पाचही जिल्हयासाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आलेले असुन त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. नाशिक जिल्हयासाठी ऋषीकेश उंडे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक ९७३०१३८७६० असा आहे. अहमदनगर जिल्हयासाठी सारिका सायगावकर यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक ८४८४८६८५४३ असा आहे. धुळे जिल्हयासाठी हितेश बोरसे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक ८००७८०३९२० असा आहे, जळगाव जिल्हयासाठी सानिका पवार यांची नेमणुक केलेली असुन नंदुरबार जिल्हयासाठी अशोक पाटील यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक ७०२०३३६०१४ असा आहे. तसेच नाशिक मंडळाचे विभागीय व्यवस्थापक या पदावर महेश पाटील यांची मे.न्यासा कंपनीने नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक ९६७३०६९४८४ असा आहे.

परिक्षार्थीना काहीही अडचण आल्यास त्यांनी वरील आपल्या जिल्हयातील जिल्हा समन्वयक किंवा झोनल मॅनजर यांचेशी उपरोक्त दुरध्वनी संपर्क साधावा, असे आवाहनही आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागरदादा गरुड यांचा रेड प्लस रक्त पेढी च्या वतीने सत्कार

Next Post

मु.जे.महाविद्यालयात भ्रष्टाचार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post
मु.जे.महाविद्यालयात भ्रष्टाचार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मु.जे.महाविद्यालयात भ्रष्टाचार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d