<
जळगाव(प्रतिनिधी)- समाजात लाचलुचपत जनजागृतीसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य गरजचे आहे. यातून समाजात विकोप आणि सुदृढ वातावरण तयार होइल. आणि ही माझी जबाबदारी आजच्या युवकांवर आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी केले.
मु.जे.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भ्रष्टाचार जनजागृती अभियान २०२१ या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोज महाजन यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर तर आभार डॉ.योगेश बोरसे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.