<
पाचोरा(प्रतिनिधी)- येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाचोरा शाखेची मासिक बैठक झेरवाल अकॅडमी येथे प्रत्यक्ष (ऑफलाईन) पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाकाळात ५ पेक्षा जास्त लोकांनां एकत्र येण्याची परवानगी नसल्यामुळे जवळजवळ मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. मात्र आज दिवाळीचे औचित्य साधून पुन्हा एकदा आधीप्रमाणे प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष स्व दिलीप तेली सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिवाळी विशेष अंक, त्यासाठी लागणाऱ्या जाहिराती तसेच विशेष अंकासाठी लिखाण व लेख इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने “फटाका मुक्त दिवाळी” चे अनावरण करण्यात आले.
हा संदेश जास्तीत जास्त जनतेपर्यंत कसा पोहचविता येईल यावर चर्चा करण्यात आली. यात सर्वांनी आपली मते मांडली व सर्वांच्या मतानुसार आगामी काळातील नियोजन तयार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, पाचोरा शाखेचे अध्यक्ष प्रा अतुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा अमोल झेरवाल, महिला संघटक अरुणा उदावंत, कायदेविषयक सल्लागार ऍड स्वप्नील पाटील, बुवाबाजी संघर्ष सहकार्यवाहक प्रा वैशाली बोरकर, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पक सुहास मोरे इत्यादी उपस्थित होते.