<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा ग्रामसेवक युनियनची विशेष सभा भुसावळ येथील कमल नयन गणपती सभागृहात जळगाव जिल्हा युनियनचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे कोषाध्यक्ष संजय जी निकम आप्पासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदर प्रसंगी ग. स. चे उपाध्यक्ष तथा विस्तार अधिकारी सुनील आप्पा पाटील हे उपस्थित होते.
यावेळी संभाव्य होऊ घातलेल्या घातलेल्या जळगाव जिल्हा ग. स. पतसंस्थेच्या निवडणुकीत ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने कुणाकुणाला उमेदवारी करावयाची आहे याबाबत जाहीर पणे आवाहन करण्यात आले या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने सर्वानुमते एकच उमेदवार देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले या युनियनच्या आव्हानाला एक मताने उपस्थितांनी प्रतिसाद देत जळगाव जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सरचिटणीस संजयजी भारंबे यांच्या नावाचा एक मताने प्रस्ताव मांडत सन्माननीय राज्य कोषाध्यक्ष संजय जी निकम आप्पासाहेब यांनी दुजोरा देत संजयजी भारंबे यांची संभाव्य उमेदवार म्हणून नावाची घोषणा हजर सभेत केली.
यावेळी संजय निकम आप्पासाहेब यांनी ग. स. निवडणुकीसाठी संवर्गाचा ग्रामसेवक युनीयनच्या उमेदवारी का आणि कशासाठी याबाबत आपली भूमिका विषद केली. त्यानुसार सभासदांच्या हिताचा विचार करता पुढील ध्येय धोरणांबाबत अपेक्षा आणि भविष्यातील आपली वाटचाल/रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन निकम आप्पासाहेब केले. त्यानुसार एक विचार एक निर्णय एक संघटना या संघटनात्मक एकजुटीतून संजय भारंबे यांच्या नावाची जाहीररीत्या घोषणा करण्यात आली त्यास सर्व उपस्थितांनी अनुमोदन देत भविष्यातील संघटनेच्या रणा रीतीनुसार पुढील वाटचाल ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा संघटनेला आणि राज्य कोषाध्यक्ष संजय जी निकम आप्पा यांना सर्वानुमते बहाल करण्यात आला.
जिल्हा युनियन ने आयोजित केलेली विशेष सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी संजयजी निकम आप्पासाहेब राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, नंदकुमार गोराडे जळगाव जिल्हाध्यक्ष, सुनील पाटील विस्तार अधिकारी तथा मा. उपाध्यक्ष ग. स. सोसायटी, प्रशांत तायडे जिल्हा सरचिटणीस जि.प. कर्मचारी महासंघ,अशोक खैरनार जिल्हा उपाध्यक्ष, संजय भारंबे जिल्हा सरचिटणीस, सी. एन. सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष, कैलास रमण पाटील जिल्हा सह सचिव, विलासराव महाले चाळीसगाव, पंजाबराव पाटील धरणगाव , सुनील दगा पाटील जिल्हा संघटक पारोळा, सुरेश पाटील जिल्हा लेखा परीक्षक, अनिल पाटील जिल्हा संघटक रावेर, प्रीतम शिरतुरे अध्यक्ष भुसावळ,दीपक भोसले अध्यक्ष पारोळा, व जितेंद्र बोरसे सचिव पारोळा,शिवाजी सोनवणे अध्यक्ष रावेर, जयवंत येवले सचिव चाळीसगाव, गिरीश चव्हाण अध्यक्ष जळगाव, शरद पाटील अध्यक्ष जामनेर, बन्सीलाल चव्हाण सचिव जामनेर, रुबाब तडवी अध्यक्ष यावल, पुरुषोत्तम तळेले सचिव यावल, राकेश मुंडके सचिव भुसावळ, विकास जळकोटे सचिव भडगाव, सतीश सत्रे सचिव पाचोरा, महीला प्रतिनिधी कांचन बादशहा मॕडम,मिना शिरतुरे मॕडम तसेच जिल्हाभरातून बहुसंख्य ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी सभेला उपस्थित होते उपस्थितींचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.