<
पाचोरा – येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समूह व क्रेडाई पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 व 31 ऑक्टोंबर 2021 या कालखंडात दोन दिवसीय वास्तू स्वप्न महोत्सव- 2021 चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाला पाचोरा येथील जनतेने उदंड प्रतिसाद दिला असून खास लोकाग्रहास्तव उद्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळ पर्यंत हा वास्तु स्वप्न महोत्सव जनतेसाठी खुला राहणार आहे अशी घोषणा पाचोरा क्रेडाईचे अध्यक्ष संजय कुमावत यांनी आज केली आहे.
पूर्वनियोजित दोन दिवसात पाचोरा येथील हजारो ग्राहकांनी या वास्तू स्वप्न महोत्सवाला भेट देऊन नवनवीन प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
या भव्य गृह प्रदर्शनात पाचोरा येथील नामांकित बिल्डर्स तसेच बांधकाम व्यवसायिक यांचे सर्व गृह प्रकल्प एकाच ठिकाणी पाहण्याची व बुकिंग करण्याची संधी उपलब्ध झाल्याने घराचे स्वप्न बाळगणाऱ्या ग्राहकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. 6 लाखापासून ते 40 लाखापर्यंत ची दर्जेदार घरे, आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले व्यापारी गाळे खरेदी करण्याची सुवर्ण संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध झालेली आहे. शिवाय स्टेट बँकेच्या अल्प दरातील गृह कर्जाची तात्काळ मदत मिळणे बाबत चे मार्गदर्शन होत असल्याने ग्राहकांना आपले वास्तुस्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
या गृह प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देणाऱ्या व्यक्तीं मधून लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.
खास लोकाग्रहास्तव उद्या दिनांक 1 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आशीर्वाद मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. वास्तु स्वप्न बाळगणाऱ्या पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या गृह प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. – असे आवाहन पाचोरा क्रेडाईचे अध्यक्ष संजय कुमावत, उपाध्यक्ष सचिन बाहेती सचिव सचिन कदम, तसेच जारगाव स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अभिलाष बोरकर, पाचोरा स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक मच्छिंद्र दुधाळ, विवेकानंद नगर शाखेच्या शाखा प्रबंधक सौ.सी. आर. नांदगावे मॅडम यांनी केले आहे.
पाचोरा येथील आयोजित या भव्य गृह प्रदर्शनात लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स, थेपडे बिल्डर्स, श्री मोरया कन्स्ट्रक्शन, तुलसी इन्फ्रा योगेश्वर बिल्डर्स, मंगलम इन्फ्रा, श्री स्वामी लँड डेव्हलपर्स, उदांतीका कन्स्ट्रक्शन, खंडेलवाल इन्फ्रा, आशीर्वाद इन्फ्रा, सिद्धांत लँड डेव्हलपर्स, साई इन्फ्रा, पी अँड बी इन्फ्रा असोसिएट्स यासह अनेक नामांकित बांधकाम कंपन्यांचे गृहप्रकल्प व माहिती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. विविध बांधकाम समूहांचे प्रस्तावित तसेच रेडी पझेशन वास्तु प्रकल्पांवर तात्काळ गृहकर्ज देण्याची सुविधा या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. जनतेने दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल ग्राहकांचे ऋण व्यक्त करून खास लोकाग्रहास्तव उद्या दिनांक एक नोव्हेंबर पर्यंत हा वास्तु स्वप्न महोत्सव वाढवण्यात आल्याचे संजय कुमावत यांनी बोलताना सांगितले.