Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री

मुंबई(प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधन व प्रशिक्षणामध्ये काळानुरूप बदल करून नावीन्यपूर्ण संशोधन करावे, संशोधनाची व्याप्ती वाढवावी, प्रशिक्षण देताना ज्याप्रमाणे अमेरिका, चीन देशांमध्ये कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षणे राबविले जातात. त्याचधर्तीवर जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

बार्टीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, दिव्यांग कल्याण आयुक्त श्री. ओमप्रकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.सामाजिक न्यायमंत्री श्री. मुंडे म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज’ व महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आर्थिक पाठबळ देऊन उच्च शिक्षणाकरिता संधी दिली व बाबासाहेबांनी त्यांच्या ज्ञानदानातून वंचित, दुर्लक्षित घटकास मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आदर्शवत जागतिक दर्जाचे असे संविधान निर्माण केले.

बार्टी व समाज कल्याण विभागातील कामकाजाचा आढावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व समाज कल्याण विभागातील कामकाजाचा आढावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.

या आढावा बैठकीत बोलताना श्री धनंजय मुंडे म्हणाले, बार्टीच्या हडपसर येथील 60 एकर जागेवर जागतिक पातळीवरील उत्कृष्ट भव्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभे करणार असून, त्याची आराखडा तत्काळ सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र या दोन्ही प्रक्रिया एकिकृत कराव्यात व पासपोर्टच्या धर्तीवर अत्याधुनिक करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक श्री.गजभिये यांनी केले, सूत्रसंचालन श्री. नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले तर आभार बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार यांनी मानले

Team Satymev Jayate

Previous Post

गांधीनगर येथील प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; २२ सुवर्ण, २३ रजत अशा एकूण ४५ पदकांची कमाई करुन पटकावले अग्रस्थान

Next Post

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo